दै चालु वार्ता वृत्तसेवा
नाशिकः नाशिकच्या कोमल जगदाळेने तिसरे सुवर्णपदक पटकावले, तर नाशिकच्या आदेश यादवने रौप्य पदकावर नाव कोरले.दिल्ली येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील राष्ट्रीय अँथलेटिक्स स्पर्धेच्या महिला गटात .या स्पर्धेत नाशिकच्या भोंसला खेळो इंडिया व एक्सलन्स सेंटरच्या धावपटूंनी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची लयलूट केली आहे.
कोमल आदेश हे दोघेही भोंसला खेळो इंडिया व एक्सलन्स सेंटरकडून खेळतात. कोमलन दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत हे पदक पटाकवले आहे. कोमलने ९:५१:३६ वेळेत हे अंतर पार केले, तर आदेशने ३०:४३:२२ वेळेत स्पर्धेचे अंतर पार केले. कोमल जगदाळे ही लांब पल्ल्यांची धावपटू आहे. या स्पर्धेत तिने याच स्पर्धेत महिलांच्या तीन हजार स्टिपलेस प्रकारात आणि महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. हे अंतर तिने कोमलने १६:०३:५३ इतक्या वेळेत कापले. स्पर्धेत हरियाणाच्या सोनिकाने १७:००:४६ वेळेत अंतर कापत रौप्य पदक मिळवले. तर एस. बाधो हिने १७:४०:४१ वेळेत अंतर कापत कांस्य पदक पटकावले. मात्र, या दोघीही कोमलच्या खूप मागे राहिल्या होत्या. या स्पर्धेत यश मिळवल्याने कोमल जगदाळे २०२२ मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.