दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम शहरात लवकरच १०० खाटांचा सुसज्ज दवाखाना उभारण्यात येणार असून कमल घुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वनरुपी क्लिनीक डायरेक्टर डॉ.राहुल घुले यांनी भूम शहरालगतच सुसज्ज असे एसीजी, ऑपरेशन, अति दक्षता विभाग, नर्सिंग सर्व प्रकारचे रोग निदान असे १०० खाटांचे रुग्णालय उभारणी करणार असल्याने भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी त्यांच्या या उपक्रमाचं स्वागत केले.येथील रहिवाशी आणि मुंबई येथे खाजगी वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ राहुल घुले हे भूम शहरात मोफत अत्याधुनिक सेवा देणारे हॉस्पिटल उभारणार आहेत.त्यामुळे भूम परंडा वाशी तालुक्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मोठी सोय होणार आहे .त्यांच्या या आदर्शवत कार्याला शुभेच्छा देत भूम न प चे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी सत्कार करुन या उपक्रमाला डॉ. श्री.घुले यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे असे श्री गाढवे म्हणाले.यावेळी अलमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे सचिव तथा उद्योजक सुरज गाढवे , प्रदीप कांबळे , ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अजित बागडे , मुकुंद लगाडे , सतीश बांगर , विशाल कदम , सचिन जाधवर हे हजर होते.यावेळी डॉ घुले हे भूम येथील रहिवाशी आहेत.ते मुंबई येथे वैद्यकीय सेवा करत आहेत . आपल्या गावच्या मातीचे काहीतरी देणे घेणे लागते . यासाठी डॉ.राहुल घुले व डॉ.अमोल घुले यांनी आपल्या भागातील गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा व्यवस्थित मिळत नाही हे लक्षात घेऊन मोफत अत्याधुनिक सेवा देणारे रुग्णालय उभारण्याचा ध्यास घेतला आहे.डॉ घुले भावंडांच्या आई कमल घुले यांच्या नावाने त्यांनी या भागात हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन केले आहे . या ठिकाणी रुग्णांना सोनोग्राफी ,सी टी स्कॅन,आय सी यु,ऑपरेशन थिएटर या विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आपल्या मातीशी नाळ जोडली गेलेली आहे.तिचे पांग फेडण्याचा हा छोटा प्रयत्न आहे.वडिलांचीही इच्छा आहे .एक ते दीड वर्षात बांधकाम पूर्ण करून रुग्णालय चालू करणार आहोत.ज्या सुविधा बार्शी व सोलापूरला मिळतात त्या सुविधा भूम येथे देणार आहोत.या अभिनव उपक्रमाला तालुक्यातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून त्यांचे कौतुक होत आहे.