गटविकास अधिकारी पाटील यांचे मत…
दै.चालु वार्ता
उस्माननगर (प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
” शासनाच्या विविध प्रकारच्या विकासात्मक योजना गावपातळीवर यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी पत्रकारांची भूमिका निश्चित महत्वपूर्ण ठरत असते. ” असे मत कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी उस्माननगर येथे बुधवारी दि. २ जुलै रोजी पत्रकारांच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या वतीने त्यांचा शाल देवून गौरव करण्यात आला.
या वेळी पाटील यांनी ” पत्रकारांच्या एकजूूटीतून उभारलेल्या पत्रकार सभागृहाचे व पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक केले.”
प्रास्ताविकात पत्रकार संघाच्या वाटचालीचा व उपक्रमांचा अध्यक्ष गणेश लोखंडे यांनी आढावा घेतला.
उपाध्यक्ष माणिक भिसे, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, देविदास डांगे, संभाजी काळम पाटील यांनी गटविकास अधिकारी महेश पाटील यांचा गौरव केला.
यावेळी दत्ता पाटील घोरबांड , चेअरमन संजय वारकड, गंगाधर भिसे, इंजिनिअर जमिल शेख, , तेजस भिसे, रवि भिसे ,आदींची उपस्थिती होती…