दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- भारतीय राष्ट्रीय आंदोलनाचे जनक ,स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळविणारच या घोषणाने युवकांना स्वराज्य मिळविण्यासाठी स्फूर्ती आणणारे लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व समाज सुधारक, सत्यवादी ,लोककवी महाराष्ट्र, मार्क्स वादी आंबेडकर वादी प्रवृतीचे , दलित साहित्याचे जनक लोकशाहीर ,साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उस्माननगर परिसरात ठिक ठिकाणी अभिवादन करण्यात आले .
उस्माननगर ता.कंधार येथील पोलीस स्टेशन येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस उस्माननगर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे यांनी पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .यावेळी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर गाडे,पोलीस आमलदार बाबासाहेब मस्के,बाबाराव सोनसळे, व आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाकडून आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे , उपाध्यक्ष माणिक भिसे,सचिव प्रदीप देशमुख, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,देविदास डांगे, राजीव अंबेकर, बाजीराव गायकवाड कळकेकर ,अंगुलीमाल सोनसळे,जेजेराव भिसे आदिनी उपस्थित राहून अभिवादन केले.
सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर येथे लोकमान्य टिळक यांची पुन्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे . शाळेतील शिक्षक देविदास डांगे,भगवान रक्षसमारे,मन्मथ केसे,नितीन लाटकर, शकील शेख, मनिषा भालेराव, सौ.सोनकांबळे मॅडम व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती डॉक्टर लोणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी आरोग्य कर्मचारी श्री ईटकापल्ले व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
जवाहरलाल नेहरू वि.वसतिगृह उस्माननगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती वसतिगृहाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी विध्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड व पर्यवेक्षक राजीव आंबेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी श्रीमती ज्योती सिरसाळकर ,सोनवळे,ना.न.लोंढे,
ईंगळे सर,जेगजेराव वाघमारे,बाजीराव पाटील, शिवचंद्र वारकड, ईतर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.यावेळी विद्यार्थी यांनी समयोचित भाषणे केली.