दै.चालू वार्ता
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड येथील शरद भवन एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड येथील वर्ग चौथी सेमी मध्ये शिकणाऱ्या स्वजल जयवंत यानभुरे या विद्यार्थिनीने सीना स्टार आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत 14 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने सीना स्टार ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवून शाळेचे नावलौकिक केले आहे स्वजल यानभुरे च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अव्वल क्रमांकावर येण्याच्या तिच्या यशाचे गमक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांत दडले आहे हे दिसून आले. हॅलो किड्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल जळकोट जिल्हा लातूर च्या सहशिक्षिका सौ डांबरे मॅडम ( गीताश्री आचडे ) , यांच्यासह महात्मा फुले प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गापासून चौथीपर्यंतचे अनुक्रमे वर्गशिक्षक सौ. विद्यावती स्वामी , सौ. सुनंदा पेशवे , श्री व्ही. एन. उमाटे , श्री उमाकांत निरणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे स्वजल यानभुरे ला राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवण्यात यश आले या तिच्या यशाबद्दल सिना स्टार कडून सन्मानपत्र , एक ट्रॉफी व रोख रक्कम बक्षीस देऊन तिचा सन्मान करण्यात आला. . एवढेच काय स्वजल यानभुरे नी तिच्या पहिल्या वर्गाच्या वर्ग शिक्षिका सौ.विद्या स्वामी ह्या 31 जुलै 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेडचे सचिव माननीय डी.पी.सावंत साहेब अध्यक्षस्थानी उपस्थित होते व प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण व अध्यक्ष साहेब व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात स्वजल यानभुरे नी सेवानिवृत्ती कार्यक्रमास अनुसरून सौ.विद्यावती स्वामी विषयी आपले मनोगत व्यक्त केले प्रसंगी वरील सर्वच दिग्गज मान्यवर अक्षरशः अवाक झाले आणि राज्याचे माजी राज्यमंत्री तथा संस्थेचे सचिव डी.पी. सावंत साहेब यांनी स्वजल यानभुरे या मुलीची बोलीभाषा , विषय ज्ञान , स्टेज करेज , विषय मांडणी या सर्व बाबींचा विचार करून स्वजलचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन तोंड भरून कौतुक केले. . याच शाळेत शिकणारा तिचा छोटा भाऊ स्वराज जयवंत यानभुरे वर्ग दुसरा सेमी या लहानग्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सीना स्टार आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विशेष प्राविण्यासह उत्कृष्ट भाषणाचे सन्मानपत्र , सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीस मिळवले व शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक केले. स्वराज यानभुरे यांचे अनुक्रमे वर्गशिक्षक सौ. विद्या स्वामी मॅडम व श्री पी.आर. राऊत सर यांचे मार्गदर्शन मिळाले स्वजल यानभुरे व स्वराज यानभुरे या दोन्हीही बहिण भावाने राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक श्री दुगाळे सर बाबानगर इन्चार्ज प्रमुख व्ही.डब्ल्यू.कल्याणकर , सहशिक्षक श्री जी.एन. उमाटे सर, श्री उमाकांत निरणे , श्री आर पी राऊत , श्री लक्ष्मण राज्यगोरे, श्री बी.बी.पुटवाड व्ही.बी.कोंडावार , राघोजीवार एम.एस.नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या सौ.विद्यावती स्वामी तसेच सौ.सुनंदा पेशवे , श्री एन.एस.ठाकूर इत्यादी सह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वजल यानभुरे व स्वराज यानभुरे यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक साहेबांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन वरील सर्व सहशिक्षकांच्या उपस्थितीत अभिनंदन करून दोघाही बहीण भावाचे कौतुक करण्यात आले.