दै.चालु वार्ता
प्रतिनिधी चिखलदरा
वासुदेव पाथरे
अमरावती (चिखलदरा): चिखलदरा तालुक्यातील सलोना येथे राज्यसभा खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अमरावती श्री.अनिल भोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक ३ ऑगस्ट २०२३ रोजी वृक्षारोपण व फळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा दरम्यान जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बछले,भाजयुमो शाखा अध्यक्ष रामकृष्ण राजने,राजेश बछले तसेच भाजपा बिहाली व गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,युवा यावेळी उपस्थित होते.