दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“बालपणीचे सवंगडी म्हणजे निस्वार्थी पणाची व्याख्या”:- श्री दिपक हट्टे.
परळी वैजनाथ येथील श्री सरस्वती विद्यालय, परळी वैजनाथ 1999-2000 च्या दहावीच्या बॅचचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ येथे राष्ट्रगीता पासून सर्वात करून नंतर हलगे गार्डन यथे मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमात मान्यवर मध्ये श्री कवडे सर, देशपांडे सर, चाटे सर, सोंदले सर, पोहणेरकर सर,रोडगे सर,बजाज मदम व टाले मॅडम , गडम सर या सर्वांची उपस्थिती होती.
सर्वांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कृतज्ञता पर भाषण व प्रास्ताविक श्रीनिवास बरडे यांनी व्यक्त केले,श्री कवडे सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली जोशी यांनी केले केले तर योगेश नानवटे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी योगेश नानवटे, श्रीनिवास बर्डे,
भाऊड्या कराड,सूरज लाहोटी,किशोरकुलकर्णी,
गणेश गांडूळे व धवल जैन ,अतिश काटकर,इम्रान खतिब, जहुर शेख, कृष्णा नागरगोजे यांनी परिश्रम घेतले.तसेच सर्व मुलींना एकत्र करण्याचे काम स्नेहा हलगे व शीतल चांडक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला
120 सवंगड्यांची उपस्थिती होती.