ममता अंध : अनाथ कल्याण केंद्र संस्थेतील नेत्रहीन विशेष मुलांना भोजनदान…
दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
03 ऑगस्ट ( पिंपळेगुरव पुणे )
पिंपळे गुरव येथील ममता अंध : अनाथ कल्याण केंद्रात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेल्या 40 विशेष मुलांना अधिक मास महीन्या निमित्त स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्विगणित करण्यात आला . मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून अनेक वेळा वेगवेगळ्या अनाश्रमात व वृद्धाश्रमातही मदत केली जाते . संस्थेच्या महिला शहराध्यक्षा मीना करंजवणे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून नेहमीच मदत करत असतात, त्यांनी या वेळी देखील सामाजिक बांधिलकी राखत स्नेहभोजनासाठी मदत केल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते सचिन करांजावणे गेल्या सहा महिन्यापासून प्रत्येक महिन्याला दोन गॅस सिलेंडर मोफत ममता अंध: कल्याण केंद्रात देतात यापुढे ही सेवा अंध विद्यार्थी साठी सदैव देणार असल्याचे केंद्र चालक तुषार कांबळे यांनी सांगितले.
शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की “आपल्या ला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते आपण दिले पाहिजे या उदात्त भावनेतून प्रत्येक नागरिकांनी आपापल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून खारीचा वाटा उचलून गरजूंना मदत केली पाहिजे. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हालाही समाधान वाटले” असे ते म्हणाले . विशेष मुलांनी भविष्यात आपल्याला काय व्हायचे आहे ते त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले,यावेळी पदाधिकारी यांनी स्नेहभोजन विशेष मुलाबरोबर जेवण केले.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मिना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड , सहसचिव गजानन धाराशिवकर, आळंदी उपाध्यक्ष पंडित वनसकर, केंद्रचालक तुषार कांबळे, मीरा देशमुख सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.