दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
दि. ०२.०८.२०२३ रोजी, कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा-रायगड संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मुश्ताक अंतुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ व्हावी म्हणून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन महाविद्यालयात होतच असतात. अलीकडेच राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, बंगलोर या संस्थेकडून महाविद्यालयास बी++ या उत्कृष्ट नामांकनाने प्रमाणित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय सेवा योजना आणि तहसील कार्यालय म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महसूल सप्ताह’ निमित्ताने आज महाविद्यालयात ‘युवा संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात म्हसळा तहसीलचे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मा. श्री. समीर घारे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. तर नायब तहसीलदार मा. श्री. गणेश तेलंगे यांनी युवा मतदार म्हणून आपली हक्क, जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावित एन.एस.एस. लिडर कु. शिवानी श्रीनाथ वर्मा हिने मांडली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कानिफ भोसले यांनी केले तर उपस्थितांचे आभार एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुमित चव्हाण यांनी मानले. सदर प्रसंगी प्रा. डाॅ. संजय बेंद्रे, प्रा. सुरेश दुंडे, प्रा. राजेंद्र हालोर, प्रा. सलमा नझीरी, प्रा. अतिका नझीरी, प्रा. सादिका अन्सारी आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.