दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा– रायगडचे भाग्यविधाते मा. खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने
जिजामाता मराठी माध्यमिक शाळा वरवठणे- आगरवाड़ा
येथे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वह्या) वाटप करण्यात आले.
या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.महादेवराव पाटील साहेब, संचालक दिलीप कांबळे, राष्ट्रवादी पक्षाचे म्हसळा तालुका अध्यक्ष मा. समीर बनकर, पंचायत समिती मा. उपसभापती मधुकर गायकर, सुनील शिगवण, शेखरसेठ खोत, समीर काळोखे, तुषार खेरटकर प्रकाश गाणेकर कार्यकर्ते मुख्याद्यापक श्री संदीप कांबळेकर, शिक्षक,कर्मचारी विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.