दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा गं.भा.स्व.करुणाताई शंकरराव बोबडे यांचे आज दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता निधन झाले.त्या ८५ वर्षाच्या होत्या.त्यांच्या पश्चात मुल,मुली,सूना असा मोठा परीवार आहे.
त्यांच्या मृतदेहावर हिंदु स्मशानभूमी सुर्जी येथे दिनांक ६ ऑगस्टला सकाळी १०:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
स्व.करुणाताई ह्या १९७३ मध्ये अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा राहाल्या.नगरसेवकांच्या निवडीतून त्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा राहिल्या.तर त्यांच्या ३ महिन्याच्या नगराध्यक्षा पदाच्या कार्यकाळात असंख्य कामे केलीत.त्यांचे पती स्व.शंकरराव बोबडे हे काँग्रेसचे दर्यापूर विधानसभेचे आमदार होते.तब्बल दोन वेळा आमदार राहिलेले स्व. शंकरराव बोबडे हे १९७८-८० व १९८०-८५ कालावधीत दर्यापूर मतदारसंघाचे आमदार राहिले.तर त्यांचे लहान सुपुत्र स्व.आदेशकुमार शं.बोबडे हे सुद्धा अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.ते सुद्धा काँग्रेस मधून निवडून आले होते.एकूणच काँग्रेस घराणेशाही लाभलेला बोबडे परिवार सद्या दुखःत आहे.स्व.करुणाताईंचे ज्येष्ठ सुपुत्र श्री.विदर्भकुमार शं.बोबडे सद्यस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीेचे प्रदेश प्रतिनिधी आहेत…