दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने बिलोली येथील आनंद गार्डन येथे राज्यस्तरीय सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह दि. ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शिवनाम सप्ताह समितीचे अध्यक्ष नागनाथ पाटील माचनूरकर आणि स्वागताध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील सावळीकर यांनी ही माहिती दिली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या आशीर्वादामुळे बिलोली येथे व्यापक बैठक होऊन अधिक मास निमित्त सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताह दि.६ ते १३ ऑगस्ट या सप्ताहात घेण्याचे ठरले. ५ ऑगस्ट रोजी अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत बिलोली शहरात भव्य शोभायात्रा काढण्याचे ठरविले आहे. यासाठी तालुक्यासह जिल्हाभरात नियोजनाच्या बैठका घेण्यात येतआहेत. सर्वधर्मीय राज्यस्तरीय सोहळ्यास राज्यातील अनेक शिवाचार्यांची उपस्थिती लाभणार आहे.
या सोहळ्याच्या तयारीसाठी विश्वंभर कुरे डोणगावकर, शंकरराव मुंडकर, आबाराव संगनोड, दत्तराम, त्रिंबक पाटील, विजयकुमार होपळे, आनंदराव बिराजदार, हनुमंतराव बोळेगावकर, हनुमंतराव कनशेट्टे, शंकरराव, बाबुराव शिवशेट्टे, अभिजीत धरमुरे, शिवलिंगराव विभुते, संग्राम पाटील हायगले, महेश पाटील हांडे, शिवकुमार बामणे, रमेश शेटकर, गंगाधर पाटील भिंगे, संभाजी पाटील बुढ्ढे, माधवराव, ओम पाटील भाले, शिवा पाटील कासराळीकर, शैलेश पाटील चिंचाळकर, नितिन देशमुख, शैलेश पाटील, सदाशिव बोडके, अक्षय मुंडकर, नागेश जवळे, मारोती (पिंटू) देशमुख, अनुप डोणगावकर, वीरभद्र साखरे, गंपू मिनकीकर यांच्या पुढाकाराने तालुक्यातील सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे…