दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – महसुल दिना निमित्ताने म्हसळा येथे 1 ऑगस्ट पासून ते 7 ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून या वेळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून 5 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी मुली आणि मुले मिनी मॅरॉथॉन तीन कि. मी. अंतराची स्पर्धा पार पडली या स्पर्धेची सुरवात श्रीवर्धन प्रांतअधिकारी, म्हसळा तहसीलदार मा समीर घारे, पी आय, संदीप सोनावणे,मा. तेलंगे नायब हसीलदार, श्री शाहा तात्या, श्री गिरे तात्या,श्रीमती निमकर मॅडम, तहसील सर्व कर्मचारी, किशोर मोहिते, क्रीडा शिक्षक नितीन पाटील, संतोष जाधव, श्री बेटकर, चंद्रकांत पवार, मान्यवरच्या उपस्थितित स्पर्धेला सुरुवात होऊन त्यात 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यात न्यू इंग्लिश स्कुल खरसई चे विद्यार्थिनी.श्वेता वसंत पयेर, प्रथम, द्वितीय प्रिया प्रकाश शीतकर न्यू इंग्लिश स्कुल खरसई, तृतीय जिशा जयंत नाकती जिजामाता मराठी मा. शाळा वरवठणे आगरवाडा, चतुर्थ शिया शशिकांत तांबे A.I. J.म्हसळा, पाचवा आर्या नरेश म्हात्रे N.E.S. म्हसळा तर मुलानं मध्ये प्रथम सुहेब महंमद इमरान A.I. J.म्हसळा, द्वितीय ओमकार बाळकृष्ण पारदुले N.E.S. म्हसळा, तृतीय स्नेहांत संजय डांगे N.E.S. म्हसळा चतृर्थ अहमद अमजद काझी A.I. J.म्हसळा, पाचवा किशोर किसन पवार याना मेडल व ट्राफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
महसूल विभागाच्या वतीने सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यातील वीरांना व त्यांच्या कुटुंबियांना मा तहसीलदार समीर घारे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वनविभागाचे भीमराव सुरीतळ यांच्या पहाडी आवाजात महसूल गीत सादर करण्यात आले कार्यक्र्माचे सूत्रसंचालन श्री संतोष जाधव यांनी केले मॅरेथॉन स्पर्धा पारपाडण्यासाठी क्रीडा व्यवस्थापक जाकीर हलसगी, देवराम डावखर, रईस शेख, मोरे हणमंत, गिरीश अस्वले, प्रफुल पाटील यांनी सहकार्य केले. व स्पर्धा पारपाडल्या.