शेतकऱ्यांनी नेमक्या समस्या मांडाव्या कोणाकडे…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – लोहा तालुक्यातील पारडी येथे असणाऱ्या तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तर होतेच तर शेतकऱ्यांना पेरणीसाठी आलेले बि – बियाणे शेतकऱ्यांना न देताना ते बियाणे कृषी सहाय्यक यांच्या मार्फत परस्पर विक्री केल्याची आक्रमक भुमीका शिवसेनेचे सुरेश पाटील हिलाल यांनी मांडली. एवढेच नव्हे तर तालुक्यात कृषी कार्यालयाच्या गावाच्या सज्जाच्या ठिकाणी असलेले कृषी सहाय्यक ना कार्यालयात ना शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर सदरील कृषी सहाय्यकांचा कारभार हा रामभरोसे दिसून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लोहा तालुक्यातील अनेक गावात कृषी सहाय्यक म्हणजे नेमक काय व त्याची कार्यप्रणाली काय असते हे शेतकरी बांधवांना माहित नाही कारण तालुक्यात अनेक गावांमध्ये कृषी सहाय्यक वर्षभरात फिरतच नाहीत तर शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक काय समजणार लोहा तालुक्यातील कृषी सहाय्यक हे केवळ नामधारी असल्याचे चित्र दिसून येत आहे .
कृषी सहाय्यक हे पद गावातील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ले शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्यासाठी शासनाने पुर्णवेळ उपलब्ध केलेले पद आहे परंतु लोहा तालुक्यातील कृषी सेवक हे कोठे कुंभकर्ण झोपेत असतात असा सवाल बळीराजाच्या तोंडातून ऐकावयास मिळत आहे.
शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम कृषी सहाय्यकामार्फत होते. पेरणी पासुन बि – बियाणांचा वापर , खते किटकनाशके , औषधे फवारणी शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे कृषी सहायकाकडून केले जातत. लोहा तालुक्यातील अनेक गावात कुंभकर्ण झोपेत असणाऱ्या या कृषी सहाय्यकांचे शेतकऱ्यांना दर्शनही होत नाही, यामुळे लोहा तालुका कृषी अधिकारी यांचा कारभारावर शेतकरी बांधवांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
लोह्याचे तालुका कृषी अधिकारी बनसोडे यांनी तालुक्यातील सर्व कृषी सेवकांच्या मनमानी करभाराची दखल न घेतल्यास लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ लवकर महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री व कृषी आयुक्त यांना भेटणार असल्याची महिती लोहा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी दिली.