गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – लोहा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार , आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे , स्वराज्य होमचे सुनिल पेनुर या तिन्ही ञिमुर्तीची जन्मभूमीसह कार्यभुमीत पण लोकप्रियता कायम असल्याने सध्या लोहा – कंधार मतदासंघात तिन्ही लोकप्रिय व्यक्तीमत्वाच्या नावलौकिकात भर पडल्याची चर्चा लोहा कंधार मतदारसंघात ऐकावयास मिळत आहे. व विशेष म्हणजे तिन्ही व्यक्ती लोहा कंधार मतदारसंघातील युवा तरूण पुण्यासारख्या ठिकाणी कामानिमित्त गेला असता त्यांचा पाहुणचार करणे व त्यांना योग्य ठिकाणी काम लावुन त्याच्या रोजी रोटीचा पण प्रश्न अति उत्साहाने सोडवतात त्यामुळे हि तिन्ही मन्याचे भुमिपुञ लोहा कंधार मतदारसंघात सतत चर्चेत व जनतेच्या मनात व लोकप्रियतेत कायम आहेत.
लोहा कंधार मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना राजकारणात ओढणे त्यांचा फक्त मतदानापुरताच वापर करणे आपला राजकीय पक्षाचा झेंडा बेरोजगार तरूणांच्या हातत देऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम सध्या लोहा कंधार मतदारसंघात चालु असल्याने सुशिक्षित बेरोजगार तरूण व्यसनाधीन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. लोहा कंधार मतदारसंघात एकनाथ दादा पवार , भिमाशंकर मामा कापसे , सुनिल पेनुरकर यांच्या समोर काम घेऊन गेलेला एकही बेरोजगार तरुण खाली हातानी पोहचला नाही , व वरील तिन्ही व्यक्ती पहिल्यांदा सोबत राहणाऱ्यांचा रोजी रोटीचा प्रश्न जिव्हाळ्याने सोडवत असल्याने आजच्या घडीला युवा वर्गासह जनसामान्य जनता तिन्ही व्यक्तीच्या लोकप्रियतेत तल्लीन असल्याचे चिन्ह दिसुन येत आहेत.
सध्या भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा लोहा कंधारचे भुमिपुञ एकनाथ दादा पवार विधानसभेची तयारी करत असले तरी त्यांनी लोहा – कंधार मतदारसंघात तिर्थक्षेत्र विकासासाठी निधी , मतदारसंघातील रुग्णांना तत्पर मदत , जनसामान्यांच्या आडणी खंबीरपणे सोडवीत असल्याने त्यांचे नावलौकिक लोहा कंधार मतदारसंघात वाढले आहे.
आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांनी संबंध महाराष्ट्रभर प्रथम महिलांचा जिजाऊ – सावित्रीच्या लेकिंचा सम्मान , कोव्हीड काळात गरजुंना जिवन उपयोगी साहित्य, सफाई कामगारांचा सम्मान , गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणासाठी अर्थिक मदत , आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अर्थिक मदत आशा सामाजिक शैक्षणिक कार्यामुळे भिमाशंकर मामा कापसे यांची लोहा कंधार जन्माभुमी सोडाच महाराष्ट्रभर लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे .
स्वराज होमचे सुनिल पेनुरकर यांनी सामाजिक कार्यासह शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत , कोव्हीड काळात , औषधे वाटप लोहा तालुक्यातील सावरगाव नसरथ येथे छञपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा , सह अन्य सामाजिक कार्यात सहभाग असल्याने सुनिल पेनुरकर यांच्याही लोकप्रियतेत कायम वाढ होत असल्याने चिन्हं दिसून येत आहे.
अशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या भारतीतील पुणे येथील महानगरपालिकेत राजकीय क्षेत्रात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांचे तर औद्योगिक क्षेत्रात आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे , स्वराज्य होमचे सुनिल पेनुरकर यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. शेतकऱ्यांचा समस्या , जनसामान्यांचे प्रश्न , बेरोजगार युवकांचे प्रश्न विविध सामाजिक , शैक्षणिक , कार्य , अत्यंत जिव्हाळ्याने या लोहा कंधार मतदारसंघातील ञिमुर्ती सोडवीतात त्यामुळे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार , आझाद ग्रुपचे भिमाशंकर मामा कापसे स्वराज्य होमचे सुनिल पेनुरकर यांची लोकप्रियता जन्माभुमीसह कार्यभुमीत पण कायम व जनसामान्याचा तोंडातुन सतत यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो.