वंचित बालकांसह गरोदर मातांचे लसीकरण…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा तालुक्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी मशीन इंद्रधनुष्य ५.० राबविण्यात येणार आहे. तीन फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार मोहिमेतील पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना व गर्भवती महिलांना लसीकरण मोहिमेचा लाभ भेटणार आहे. बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण एक प्रभावी साधन आहे अर्धवट झालेल्या लसीकरण तसेच लसीकरण न झालेल्या बालके संपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांच्या तुलनेत लवकरच आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.केंद्राने गोवर रूबेला आजारावर धुरीकरणाचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी विशेष विशेषण मिशन इंद्रधनुष्य ५.० मोहिमेअंतर्गत शून्य ते दोन वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्याचे सर्व लसीकरण लसीकरण करण्यात येणार आहे या वयोगटातील ज्या बालकांना लस गोवर दिली आहे रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डी पी टी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस तसेच इतर मार्गदर्शन सूचनेनुसार लसीकरण राहिले असेल त्याचेही लसीकरण केले जाईल. .. *२८ ठिकाणी लसीकरण सत्रे*
यासाठी मंठा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २८ लसीकरण सत्रे, तीन मोबाइल टिमद्धारे लसीकरणापासून वंचित असणाऱ्या २४२ बालके व ९४ गरोदर मातांना या ‘मिशन इंद्रधनुष्य’ मध्ये लस देण्यात येणार आहे.
*आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी तयारीला वेग आला आहे.* • लसीकरणाची मोहीम मंठा तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात आहे. यासाठी नुकतीच मंठा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत सहभागी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलीमा हिरणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन कांगणे, डॉ. योगेश चव्हाण, डॉ. अनिकेत राऊत, डॉ. शिवाजी निलर्वेण, आरोग्य सहाय्यक विलास देशमुख, सुजीत वाघमारे, सचिन उज्जैनकर, मोमीन पाशा यांच्यासह तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रर्वतक उपस्थित होते.
मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट, दुसरी फेरी ११ ते १६ सप्टेंबर आणि तिसरी फेरी ९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे..