दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :-
भारतीय बौद्ध महसभेचे कार्यकर्ते ,बौद्धाचार्य ,सामाजिक कार्यकर्ते मनोज जमदाडे यांच्या आजी तथा शिराढोण ता.कंधार येथील ग्रामपंचायत सदस्या तथा सर्वांची लाडकी , गावातील प्रतेकांच्या सुखदुखात धाऊन जाणरी कालवश
मान्याबाई भिमराव जमदाडे यांचे वृद्धापकाळाने रविवारी दुपारी राहत्या घरी निधन झाले. त्या ७४ वर्षाच्या होत्या.
कालवश मान्याबाई भिमराव जमदाङे या शिराढोण परिसरात दाईन म्हणुन परिचित होत्या.त्यांना सर्वजन लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत माय म्हणून हाक मारत होते. महीलाच्या प्रस्तुती च्या वेळात दवाखान्यात न पाठविता अनेक महीलाचे बाळंतपण केले आहेत. का.मान्याबाई भिमराव जमदाडे यांना त्याच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन नुकताच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिराढोण येथील ग्रामपंचायतच्या वतिने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
.. त्यांच्या पश्चात चार मुले , तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. मान्याबाई यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.07/08/2023 सोमवारी दुपारी दोन वाजता शिराढोण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.