दैनिक चालू वार्ता
हिमायतनगर प्रतिनिधी राम चिंतलवाड
आमदार जवळगावकर यांचे हस्ते संभागृहाचे लोकार्पण.
सोनारी फाटा / मौजे करंजी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आनंदाने व उत्साहाने दिं ६ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास करंजी नवी आबादी येथील सभागृहाचे उद्घाटन आमदार माधवराव पाटील यांच्या शुभ हस्ते करून नवीन सभागृहात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लाल ध्वज चडून अण्णाभाऊ साठे यांची 103वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे मातंग समाजासाठी सभागृह बांधण्यात यावे अशी मागणी करंजी ग्रामपंचायत कार्यालय व येथील मातंग समाजाच्या वतीने आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या कडे गेल्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या वेळी करण्यात आली होती. आणि आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पुढील वर्षीची अण्णाभाऊ साठे यांची जयंती सभागृहातच होईल असे आश्वासन येथील मातंग समाजाला दिले होते. त्याचप्रमाणे करंजी येथे सभागृहाचे काम करून दिले आणि आज करंजी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती म्हटल्याप्रमाणे सभागृहातच साजरी करण्यात आली आहे आणि मी फक्त आश्वासन देत नाही आणि दिल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील यांनी बोलताना सांगितले आहे तसेच आ.माधवराव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे करंजी येथे सभागृहाचे काम करून दिल्याबद्दल सर्व मातंग समाजाच्या वतीने आभार मानले असुन नियोजनाप्रमाणे करंजी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ जयंती यांची जयंती व लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन प्रमाणे दिनाक ०६ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी हदगांव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या शुभ हस्ते सभागृहाचे उद्घाटन करुन डॉ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती नवीन सभागृहात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यकर्माचे सूत्रसंचालन गजानन सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार शिवाजी गाडेकर यांनी केले.यावेळी सुभाष दादा राठोड,सभापती जनार्धन ताडेवाड,रफिक शेठ, संजय माने,संजय पाटील दूधडकर, संतोष आंबेकर,अतुल वानखेडे,योगेश चिलकावार, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश शिंदे,आदिल भाई विरसनिकर, श्रीदत्त पाटील, संजय गुंडेकर, पवन बनसोडे, नामदेव मोकासवड, कपिल कांबळे, ढेमकेवाड सर,पंडीत ढोणे, सुनील गुंडेकर, संदीप गुंडेकर, विकास मनपुरे, बालाजी बनसोडे, गजानन वाघमारे, चंदू भालेराव,नासर पठाण, बालाजी पुट्ठेवाड,रउफ पठाण,विकास गाडेकर, केशव सोळंके, रंगराव पाटील, रंगराव पाटील,दशरथ वाघमारे, सुदर्शन जाधव,गजानन उमाटे,पांडुरंग सूर्यवंशी, शबीर पठाण, निरंजन जाधव, रामकिशन सुकरवार,शिवाजी गाडेकर,परमेश्वर सूर्यवंशी,नारायणराव सूर्यवंशी, केशवराव परभणकर,बाळू जाधव, शिवाजी पवार,अनिल तालेवार,श्रीनिवास सूर्यवंशी,तानाजी गाडेकर,दत्ता जाधव, चांदराव गाडेकर,गजानन गाडेकर, माधव गाडेकर परमेश्वर गाडेकर,अनिल गाडेकर दिलीप गाडगेराव, दिलीप गाडेकर, शंकर गाडेकर, जळबा गाडेकर,मारोती गाडगेराव,अनिल गाडेकर सुरेश गाडेकर,वसंता गाडेकर,खय्युम भाई, अकबर भाई,व अनेक मान्यवर उपस्थित होते.