वनविभागाने सागवानी साहित्य केले जप्त…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (परतवाडा) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रुई फाटा गावात अवैध्य सागवान तस्करी करून साहित्य बनविणाऱ्यावर वनविभागाने कारवाही केली असून उपसंरक्षक प्रादेशिक वनविभाग यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई करण्यात आली.
सदर प्रकरण असे की,अंजनगाव परीक्षेत्र,टेम्ब्रूसोंडा वर्तुळ,सत्ती बीटला लागुन रुईफाटा गावात वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मा.उपवनसरंक्षक मेळघाट प्रादेशिक,परतवाडा यांच्या मार्गदर्शनात दि.७ ऑगस्ट २०२३ रोजी शोध वॉरंट जारी करून अवैध्य सागवान तस्कर गोपीचंद राठोर यांच्या राहत्या घरात शोध घेण्यात आला.घरामध्ये अवैध सागवान चीर काम करुन चौकट,दरवाजे,पल्ले, व इतर साहित्य अर्धवट बनवलेले दिसून आले.
गोपीचंद राठोर रा.रुईफाटा याने जंगलातून सागवानी झाडे कापून पाट्या व चौकट बनविण्याचे कामे करीत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले.तसेच सदर ठिकाण वरुन त्यांचे जवळून वरील सागवानी माल व औजारे साहित्य जप्त करण्यात आले.सदर कारवाहीतील आरोपी फरार असून कारवाहीमध्ये विजय गुलरेकर वनपरीक्षेत्र अंजनगाव,श्री डहाके टेम्बरूसोंडा वर्तुळ,संदीप बरबत,निखिल संदनशिव,सोडगीर,बाळू महारनर,पवन यादव,अमोल देशमुख,सौ.संगीता वरोकर,रुचिता पांडे,भैयालाल कसदेकर व इतर कर्मचारी होते…