दै.चालु वार्ता
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी शितल रमेश पंडोरे
संभाजीनगर (सिल्लोड) ते भराडी रस्त्यावरील सूतगिरणी मैदानासमोर याच परिसरात राहणारा मेंढपाळ सुभाष गुंजाळ (रा. सिसारखेडा, ता. सिल्लोड) हा आपल्या मेंढ्या चारत असताना काही मेंढ्या रस्ता ओलांडीत होत्या. त्याच दरम्यान भराडी कडून सिल्लोडकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (क्र. एम. एच. 19 झेड 5308) ने या रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्यांना अक्षरशः चिरडले. या अपघातात 17 मेंढ्या जागीच ठार झाल्या असून आठ ते दहा मेंढ्या जखमी झाल्या आहेत.
मेंढपाळाच्या पत्नीने हिम्मत करून धावत जाऊन ट्रकच्या समोर उभी राहिल्याने ट्रक चालकाला ट्रक थांबवावी लागली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुनील पाटील मिरकर, सिल्लोडचे नगरसेवक सुनील दुधे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्त मेंढपाळास आधार दिला.