पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळा कारभार समोर. नांदेड(देगलूर): दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी बिलोली आगाराची रावधानोरा बस दररोजच्या प्रमाणे रावधानोराहून कुंडलवाडीकडे येत असताना पिंपळगाव गावाजवळील गणपती मंदीराच्या शेजारील वळणावर बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याखाली उतरली असून त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
बिलोली आगाराची बिलोली रावधानोरा बस क्रमांक (एम. एच.२० डी. एल. १९०३) हि बस नेहमी प्रमाणे कुंडलवाडी, पिंपळगाव मार्गे रावधानोरा ये-जा करीत असते. मंगळवारी (ता.८ रोजी दुपारी १२ वाजता रावधानोराहुन बिलोलीकडे जात असताना मौजे पिंपळगाव गावालगत असलेल्या गणपती मंदिराशेजारील वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाला. या अपघातात जवळपास १४ प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली असून सर्व प्रवाशांवर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. मोरे यांनी प्रथमोपचार करून घरी पाठवले आहे. या अपघातात झाला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. संबंधित घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख सुभाष पवार, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित कासले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
Related Stories
3 days ago