दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड (देगलूर):देगलूर बिलोली मतदारसंघ निवडणुकांतील विधानसभा २०२४ साठी भावी आमदार म्हणून दिपक कांबळे यांची देगलूर बिलोली शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी भावी आमदार म्हणून असे बॅनर झळकत आहेत .देगलूर बिलोली मतदारसंघातील रामपूर येथील सामान्य कुटुंबातील दिपक कांबळे यांनी अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करून ध्येयाचे शिखर अन् अजोड जिद्द बाळगून प्रगती मार्गाची उतुंग भरारी घेत तब्बल तेरा राज्यात आपल्या अँक्टिव्हपे मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हे नाव लौकिक करत ८००० हुन अधिक बेरोजगारला रोजगार उपलब्ध करून दिले असल्याने आज दि. ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत दैनिक चालू वार्ता पेपर देगलूर प्रतिनिधींनीशी संवाद साधतांना उधोजक दिपक कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .एखाद्या क्षेत्रात काम करण्याची खुनगाठ मनाशी बांधल्या नंतर त्यात जीव ओतून समर्पत भावनेने स्वता:ला झोकून देणे गरजेचे असते. अँक्टिव्हपे मँनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा धुरा सांभाळतांना मी प्रगतीच्या मार्गावर जातांना यशाची उतुंग भरारी घेणारच अशी ध्येयाचे शिखर गाठण्याची अजोड जिद्द बाळगून प्रामाणिक निष्ठेने अविरत परिश्रम घेतले. त्याच कठोर मेहनतीचे फलित म्हणून आज माझी कंपनी गुणवत्तापुर्ण दर्जेदार सेवा देण्यात तेरा राज्यात अव्वल ठरतेय याचा मला सार्थ अभिमान अन् आनंदही असल्याची निखळ भावना कंपनीचे सर्व्हेसर्वा तथा आजच्या पिढीसाठी एक आदर्शवत उद्योजक असणारे कंपनीचे एम. डी. दिपक कांबळे यांनी व्यक्त केले.
प्रत्येक यशाची कहाणी कठोर संघर्षातून पुढे गेलेली असते.परिस्थिती कशी असो, संघर्षातून मिळालेले यश हे सहजासहजी मिळवलेल्या सामर्थ्याला कौतुक कधीच नसते. स्वतःबरोबर कंपनीची ही प्रगती केल्यामुळे महाराष्ट्रसह अन्य राज्यात अँक्टिव्हपे मॅनेजमेण्ट सर्विसेस प्रा.ली. माध्यमातून खुप काबाड परिश्रम घेतल्यानंतर माझ्यासह कंपनीचे नावलौकिक झाले. याबद्दल मी समाधानी असून लहानपणा पासून आर्थिक परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातून शहरात संघर्षमय प्रवास केला.तसेच अल्पभूधारक व सामान्य कुंटुबातून घरात शैक्षणिक वातावरण व वडिलांची आर्थिक परिस्थिती नसतांना जिद्दीने कसाबसा शिक्षणपूर्णा करत आज यशस्वीपणे माझी कंपनी तेरा राज्यात काम करीत असल्यामुळे मी समाधान असून जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. या हेतूने देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित साठी राखीव असल्यामुळे या मतदारसंघाचा लेखाजोखा माहिती घेताना देगलूर -बिलोली तालुक्यातील असंख्य सुशिक्षित बेरोजगार कामाच्या शोधात पुणे-मुंबई, आणि तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात गेले आहेत.
तसेच या राखीव देगलूर मतदारसंघातील दोन्ही तालुक्याचा आढावा घेताना बहुतांशी सामान्य जनता या राखीव मतदारसंघात वंचित आहे. तहसील प्रशासन, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, ग्रामीण व वाडी तांड्यावरील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दयनीय अवस्था यासह शेतकऱ्यांच्या शेती बांध्यावर जाऊन बळीराजाच्या समस्य जाणून घेताना मनाला खुप वेदना झाल्याने माझा हा मतदारसंघ राखीव असल्याने शासनाच्या विविध योजनेपासून असंख्य जनता वंचित असल्याचे निदर्शनास आले.देगलूर – बिलोली हा विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत बौद्ध समाजाला कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्यांनी उमेदवारी दिली नसल्याने या मतदारसंघातील जनतेचा विकास होऊ शकला नाही अशी खंत अनेकांनी व्यक्त केली असल्याने या मतदारसंघाचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहेनतदारसंघातील जनतेचा विकास होऊ शकला नाहा अशी खंत अनेकांनी व्यक्त केली असल्याने या मतदारसंघाचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे
देगलूर विधानसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये असित्वात आला असून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्या अनुषंगाने देगलूर मतदारसंघाची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. त्यामध्ये देगलूर तालुक्यात दोन लाख 30 हजार तर बिलोली मध्ये एक लाख ८५ हजार एवढी लोकसंख्या देगलूर पोट निवडणुकीच्या जणगणनेनुसार असून देगलूर मध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण आहेत. तर बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चार गटासह आठ पंचायत समितीच्या गणांचा समावेश आहे.
बिलोली- देगलूर मतदारसंघातील भूमीपुत्र असल्याने बेरोजगार अन् मोलमजुरी करणाऱ्याच्या हाताला काम मिळवून शासनाच्या योजना गांव तेथील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळावा याहेतूने या मतदारसंघात मी फेरफटका मारला असता काही हितचिंतक राजकीय लोकप्रतिनिधी अन् तमाम जनतेने या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आशावादी प्रश्न उभा केल्याने आगामी २०२४ विधानसभेची निवडणूक देगलूर या राखीव मतदारसंघा मधून लढवण्यासाठी बौद्ध समाजाचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्षांनी दिपक कांबळे यांना उमेदवारीची संधी द्यावे असे त्यांच्या अभिष्टचिंतना निमित्त अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरच बिलोली देगलूर मतदारसंघ येणाऱ्या विधानसभेसाठी दिपक भाऊ कांबळे यांची वर्णी लागेल का…?