दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी बीड/अंबाजोगाई
अंबाजोगाई येथे दिनांक ०९ रोजी सकाळी दहाच्या दरम्यान रस्ता रोको अंबाजोगाई जिल्हा निर्मिती आक्रोश मोर्चा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, सदर आंदोलनात सर्व अंबाजोगाई कर व अंबाजोगाई च्या आजूबाजूतील सर्व खेड्यापाड्यातील लोक उपस्थित होते.
रस्ता रोको आंदोलना विषयी आपले मत मांडताना व पुढील आखणी काय करता येईल या साठी अंबाजोगाईतील सर्व मान्यवर नेत्यांनी आपले मत व्यक्त केले.
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे व जिल्हा होण्यासाठी ज्या प्रशासकीय बाबी आहेत त्या संपूर्ण अंबाजोगाईत अगोदर पासूनच आहेत जसे की आरटीओ ऑफिस एम एच 44, उपजिल्हाधिकारी कार्यालय, आशिया खंडातील नामांकित रुग्णालयापैकी एक रुग्णालय अंबाजोगाईतच आहे, एसपी कार्यालय , जिल्हा सत्र न्यायालय, असे बरेच कार्यालय जिल्हा होण्यासाठी आवश्यक असतात हे अगोदरच अंबाजोगाईत आहेत, त्यामुळे अंबाजोगाई जिल्हा होण्यास काहीच हरकत नाही व जिल्हा होण्यासाठी अंबाजोगाईतून गेली चार, पाच दशकं आंदोलन सतत करण्यात येते पण जिल्हा काही होत नाही याचे पण शल्य सर्व अंबाजोगाई करांनी व्यक्त करून दाखवले.
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे असा आक्रोश मोर्चात सर्व युवक, महिला, मान्यवर नेते उपस्थित होते.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती रस्ता रोको आंदोलन जवळपास एक ते दोन तास चालू होते त्यामुळे वाहतूक विस्कळित होऊ लागली होती व जवळपास अंबाजोगाईला येणाऱ्या व जाणाऱ्या या गाड्या आपापल्या जागेवर थांबून एक ते दोन किलोमीटरची लाईन लागली होती सदरील वाहतूक कोलमडू नये म्हणून सुसंस्कृत अंबाजोगाई करांनी सदरील रस्ता रोको आंदोलनात तहसीलदार यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित कले व जर जिल्हा लवकर जाहीर नाही केला तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा सज्जड इशारा अंबाजोगाईकरांनी केला आहे.
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती रस्ता रोको आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते उपस्थित होते.