दैनिक चालु वार्ता
जिल्हा प्रतिनिधी किशोर फड बीड अंबाजोगाई
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सर्व संस्कार केंद्रातून सामाजिक कार्य आणि देशभक्तीचे संस्कार केले जातात ही परंपरा तिसऱ्या पिढीतही जपली जात आहे. या संस्थेचे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात गेले तरी तेथे वेगळा ठसा निर्माण करतात. हेच संस्कार माझ्या कामाची प्रेरणा आणि माझी शिदोरी आहेत. सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक तथा वकील मा.श्री सुरेश कोंडिबा गित्ते
श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय, (प्रगती विभाग) अंबाजोगाई
आज दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी क्रांतिकारक सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा.मुख्याध्यापक श्री.आप्पाराव यादव सर, विभाग प्रमुख मा.सौ.वर्षाताई मुंडे व प्रमुख अतिथी म्हणून सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक तथा वकील व कुस्तीपट्टू तसेच खोलेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या प्रगती विभागाचे शाळेतील आजोबा पालक मा.श्री.सुरेश कोंडीबा गीते उपस्थित होते…
प्रथमतः अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मान्यवरांच्या स्वागत व परिचयानंतर *क्रांतीकारक सप्ताहाचा उपक्रम* म्हणून सर्व वर्गशिक्षकांना व उत्सवप्रतिनिधींना वर्गशः क्रांतीकारकांच्या प्रतिमा देण्यात आल्या. या प्रतिमांचे क्रांतीसप्ताहात दररोज वर्गामध्ये पूजन सर्व विद्यार्थी करणार आहेत. वैयक्तिक पद्य कु.समृद्धी शिंदे या विद्यार्थिनीने सादर केले .
मा.श्री.सुरेश कोंडीबा गीते यांच्या मुलाखतीदरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले… प्रश्नांना अनुसरून समर्पक उत्तरे दिली. त्यांच्या कार्यकाळातील धाडसी व संवेदनशील प्रसंग सांगितले तसेच योग्य उदाहरणे देऊन लहान विद्यार्थ्यांना समजेल अशी दैनंदिन उदाहरणे देऊन स्वतःच्या वस्तू जपणे, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, देशसेवा, विविध खेळ खेळले पाहिजे, त्यांचे महत्त्व समजावून सांगितले.
या सप्ताहात दररोज वर्गशः क्रांतिकारकांचे प्रतिमापूजन करुन विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने भित्तीपत्रक, हस्तलिखित, प्रदर्शनी तयार केली जाणार आहे. दि.१२ऑगस्ट रोजी इ.२री च्या विद्यार्थ्यांची क्रांतिकारकांच्या विषयी बालसभा सादर होणार आहे. आभार व सूत्रसंचालन श्री.परमेश्वर राठोड यांनी केले.