दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे:लोहगाव गावातील नामवंत वस्ताद पै नामदेव दामोदर गरुड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव गरुड यांचे थोरले बंधू आहे. तसेच त्यांचे दुसरे बंधू बापूसाहेब गरूड( वि. का.का. सोसायटी चेअरमन) आहेत. कै नामदेव गरूड हे १९८५ ते २००५ पर्यंत वस्ताद म्हणून लोहगाव मध्ये त्यांनी काम पाहिलेले आहे,आपला शेती आणि दुधाचे व्यवसाय सांभाळून त्यांनी अनेक लहोगाव मध्ये अनेक मल्ल तयार केले आहेत. त्यापैकी त्यांची दोन्हीं मुले पै संतोष गरुड उप महाराष्ट्र केसरी पर्यंत आणि सागर गरुड हे पुणे आणि महाराष्ट्र चॅम्पियन सुवर्णपदापर्यंत तसेच त्यांचे पुतणे मंगेश गरुड, अक्षय गरूड युवा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन आणि अनेक पैलवान पुणे चॅम्पियन ,कोथरूड केसरी ,सांगली केसरी, सातारा केसरी झालेले आहेत त्यांच्या जाण्याने लोहगाव आणि गरुड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सुनील भाऊ टिंगरे , बापूसाहेब पाठारे ,पै महेश दादा लांडगे,पै मंगल बांदल ,शंकरकाका भुमकर जिल्हा परिषद सदस्य यांनी दुःख सावरण्याची परमेश्वर कडे प्रार्थना केली.त्यांचा द्रशक्रिर्याचा कार्यक्रम बुधवार दि.९/८/२०२३ रोजी लोहगाव येथे होईल. शोकाकुल -समस्त गरूड, शिंदे, ताजणे ,भुजबळ,गोरे ,कुदळे, बाणेकर ,घुमटकर ,बेंद्रे परिवार…