दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे.
जालना, मंठा:- आगामी काळामध्ये मंठा तालुक्याचा विकास कामाचा आराखडा करून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या ज्या योजना महाराष्ट्र सरकारने उचलले आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत नेऊन. हर खेती पाणी हर घर जल योजना, मंठा तालुका एमआयडीसी मागणी यामुळे जिल्ह्यासह देशाला जोडण्याचा मानस असून मंठा तालुक्यात वारकरी भवन, लोककला भवन उभारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार याचबरोबर मंठा ग्रामीण आरोग्य केंद्रास उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतरित करण्यासह तळणी येथे ग्रामीण रुग्णालय रूपांतर करण्यासाठी पाठपुरावा करणार असे मंठा तालुका शिवसेना तालुका प्रमुख अध्यक्ष उदयसिंह बोराडे यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मंठा तालुका विकास कामाबद्दल विचारमंथन केले.