बस खड्ड्यात तीसपेक्षा अधिक प्रवासी जखमी…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा दवणे..
जालना (मंठा) पुसदहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला मंठा तालुक्यातील केंधळी फाट्याजवळ अपघात झाला. बस पुढे नेण्याच्या प्रयत्नात बस एका तीस ते चाळीस फूट खोल खड्ड्यात कोसळून ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली यामध्ये जीवित हानी झाल्याची माहिती नाही. ट्रेकच्या पुढे जाण्यासाठीचा प्रयत्नात हुलकावणी बसून हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जमखींना मंठ्याच्या शासकीय रूग्णालयत उपचार करण्यात येत असून, गंभीर असलेल्या प्रवाशांना जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिक, राजकीय तसेच सामाजिक पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले. काही वेळा पूर्वी साडेआठवाजे दरम्यान मंठा जालना रोडवरील केंधळीपाटी जवळील पुलालगत घडलेल्या बसच्या अपघातात एकूण ३० रुग्णांपैकी सात रुग्णांना जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आलेले आहे व यातील २३ प्रवासी मंठा सरकारी रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. बस मध्ये एकूण ४२ प्रवासी प्रवास करत होते. या भीषण अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.