
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
हदगाव तालुक्यातील मौजे फळी येथुन अवैध लिंबाच्या लाकडाची वाहतुक करणारा टाटा मॅक्स एम एच. 38 एक्स 1711 हे वाहन क्रमांक हदगाव येथे तोडलेली अवैध लिंबाची झाडे घेऊन निघत असताना गुप्त चरा कडून माहिती मिळताच वनपाल मा. सालमेटे साहेब यांनि आपल्या सहकारी याच्या सोबत तातकाळ मौजे फळी या दिशेने धाव घेतली काही क्षनातच हदगाव हायवे रोडवर हदगावचे वनपाल मा. सालमेटे साहेब यांनि व त्यांच्यासोबत असलेल्या इतर वन विभागातील कर्मचाऱ्यांनी मौजे फळी ते हदगाव अवैधरित्या लिंबाचे लाकडे
तोडून वाहतूक करीत असताना वाहन
क्रमांक एम एच 38 एक्स 1711 टाटा
मॅक्स वाहन पकडून वनपाल सालमेटे साहेब, आणि वनरक्षक कु.पांचाळ, कु. एकता कावळे, वृंदावन नागरगोजे, कुमारी डी एम शिंदे, यांनी सहाय्यक
वनरक्षक भीम सिंग ठाकूर,व वनपरिक्षेत्राधिकारी मा.कटके साहेब
हदगाव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाही महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम 1964 कलम 3 अन्वये करण्यात आली आहे. सध्या वाहनातील अवैध रित्या वल्ली लिंबाच्या झाडाची लाकडे जप्त करण्यात आली आहे. जप्त
केलेल्या मालाची किमत अंदाजे पाच ते दहा हजार असुन टाटा मजिक सह
एकलाख दहाहजार आहे असे वनपालाचे म्हणने आहे.