दै.चालू वार्ता
प्रतिनिधी वाशिम दिनकर गडदे
वाशिम: पिंपळगाव डाक बंगला येथे दि 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा सण साजरा झाला. वर्षभरात शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण म्हणजे बैलपोळा आहे. शेतकऱ्याचा सखा सोबती प्रत्येक सुख दुखात सहभागी असणारा धन्यासाठी वर्षभर राब राब राबणाऱ्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यात एका मागे एक एक सण येत असतात.
नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन,गोकुळाष्टमी या सणाबरोबरच अमावस्येला सर्जा -राजाचा सण म्हणजे बैलपोळा. विशेष म्हणजे बैलांना या दिवशी कामापासून विश्रांती दिली जाते. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. खासकरून शेतकऱ्याचा खरा मित्र वर्षानुवर्षे साथ देणारा सर्जा राजासाठी पोळ्याचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. खास करून प्रथम येणाऱ्या बैल जोडीस विशेष बक्षीस ठेवण्यात आले होते.
कृषी सहायक राहुल दंडे यांच्याकडून प्रथम क्रमांक येणाऱ्या बैल जोडीस 501 रुपया बक्षीस देण्यात आले. शिवाजी घ्यार, डॉ हरी आहेर, प्रगतशील शेतकरी सुभाष भुसारे, पंडित बोधनकर, पंडित कुटे, उपस्थित होते…