दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर.
( पुणे ) वाघोली : पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही. ‘गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे’ असे विधान करीत उपस्थितांत स्फुरण भरण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे मा.आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी केला. ते राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलत होते.शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्षात दोन गट तयार झाले.
त्या अनुषंगाने शरद पवार समर्थक पक्षाची कार्येकर्ता संवाद बैठक 14सप्टेंबर रोजी तळेगाव ढमढेरे येथे गीताई विष्णू मंगलकार्यालयात मा. आमदार जगन्नाथ शेवाळे यांचे अध्यक्षतेत पार पडली.
अॅड.आमदार अशोक पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात शरद पवार विचाराचे वादळ देशात कधीच शमणार नसल्याचे सांगत आगामी निवडणुकीत शरद पवारांच्या विचारधारेचे आमदार निवडून आणणार असल्याचे आश्वासित केले. पक्ष सोडून गेलेल्याना आम्ही घाबरत नाही ‘गेले ते कावळे व राहिले ते मावळे’.. असे विधान करीत उपस्थित राष्ट्रवादी कार्येकर्त्यांमध्ये स्फुरण भरण्याचा प्रयत्न केला.
तर पुणे युवा जिल्हाध्यक्ष स्वप्नीलभैया गायकवाड यांनी भाजपाला 2024 च्या निवडणुकीची भीती असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पाडल्याचे सांगत भविष्यातील सर्वच निवडणुकीत शरद पवारांच्या विचार धारेतील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविल्या जाणार असल्याचे जाहीर केले. विचाराने तरुण असणारी माणसं नेहमी संघटनात्मक बाबतीत शरद पवारांसारखी तरुण असतात असे सांगत सत्तेशिवाय न्याय मिळत नसतो म्हणून आपणास शरद पवारांच्या नैतृत्वातील सत्ता स्थापित करण्यासाठी सर्वांनी पक्षकार्ये करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्येकर्त्याना केले.
राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष नामदेवराव गिरमकर यांनी बोलताना सांगितले की ज्यांना ज्यांना शरद पवारांनी मोठे केले ते सर्व नेते पवारांना विसरून सत्तेत मस्त झाले. आपली वैचारिक बांधिलकी धर्मनिरपेक्षते सोबत आहे. याचा विसर काही नेत्यांना पडला.
शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तरुण,ज्येष्ठ वर्ग एकवटत असून सर्व ठिकाणी भरघोस प्रतिसाद मिळत आहे. फुटीरांना त्यांची जागा आपल्याला दाखवावी लागेल.
या कार्येकर्ता संवाद बैठकीत यावेळी नामदेव गिरमकर, समता परिषेदेचे सोमनाथ भुजबळ, नितीन वडघुले, महिला अध्यक्षा संगिता शेवाळे, लतिका वराळे, महेश ढेरंगे, शिवाजी शेलार, संतोष दरेकर, राजेंद्र दरेकर, शिरीष लोळगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, कात्रज दुध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पंडित दरेकर, माजी उपसभापती अनिल भुजबळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा, कारखान्याचे माजी संचालक दिलीप मोकाशी, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले,शिरूर तालुक्याच्या महिला अध्यक्षा विद्या भुजबळ, माजी सभापती आरती भुजबळ, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, उद्योजक राहुल करपे, राजेंद्र गिरमकर,माजी उपसरपंच राजेश जाधव, सुहास दरेकर, अनिल गोटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला भगिनी,ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभारप्रदर्शन संचालक विश्वास ढमढेरे
यांनी केले.