धनंजय गोफणे परंडा प्रतिनिधी
धाराशिव परंडा- तालुक्यातील भोंजा हवेली येथील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्या डॉ दिपा सावळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मा झालेल्या शुर वीरांना त्रिवार वंदन करून भारत स्वतंत्र झाला परंतु जुनागढ, काश्मीर, हैद्राबाद संस्थान हे निजामशाहीतून विभक्त झाले नव्हते यासाठी मराठवाडा दगडाबाई शेळके यांनी स्वतः बंधूक हाती घेतल्या तर स्व. वल्लभभाई पटेलांनी चौरास घेराव घालून निजामशाहीला झुकवण्याचे काम केले तेव्हा १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम झाला.
त्याचबरोबर शालेय कार्यक्रम घटक चाचणी क्रमांक एक मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच राणी समाधान कोळी, प्रा.नलवडे, उपसरपंच शिवाजी घाडगे, सदस्य रवींद्र मोरे, व्हाईसचेअरमन सतिश नेटके, मा संचालक श्रीनिवास भांदुर्गे, लघुउद्योग सल्लागार/ डायरेक्टर गणेशदादा नेटके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुब्राव मोरे,
उपाध्यक्ष अमोल नेटके, सदस्य हणूमंत जगताप, नवनाथ नेटके, हनुमंत कोंडलकर, बाळासाहेब नेटके, हनुमंत काशीद, सुनिल दाणे, समाधान कोळी, सर्जेराव मोरे, जिवन मोरे, विजय पडदुणे, देविदास सरवदे, बाबुराव कोंडलकर, सदस्य अर्चना पोळके, सदस्य माधुरी सरवदे, अंगणवाडी कर्मचारी संध्या पाटील, ग्रामसंघ पदाधिकारी कोळी, नेटके, काशिद प्रेरिका व गावतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाड्याचे वैभव पैठणीच्या वेशात सहावीच्या मुलींनी सर्व पाहुण्यांचे स्वागत गीतातून केले. मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
डॉ प्रा दिपा सावळे यांनी स्वलिखित पुस्तके व इतर विज्ञानावर आधारित पुस्तके शाळेला भेट दिली व शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदिनाथ शेळवणे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कवी श्री बाळासाहेब घोगरे, सोमनाथ पवार, श्रीमती माळी मॅडम, श्रीमती राऊत मॅडम यांनी परिश्रम घेतले.