मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर पत्नींचा व त्यांच्या परिवाराचा प्रशासनाच्या वतीने सन्मान..
देगलूर मधील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान…
रक्तदान शिबिरात तीस जणांनी केला रक्तदान…
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर): दि. 17 सप्टेंबर 2023 रोजीमराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम गटविकास अधिकारी शेखर देशमुख गटशिक्षण अधिकारी तोटरे आणि शहरातील व तालुक्यातील मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीर सैनिकांच्या परिवाराचे सदस्य शहरातील नागरिक, एनसीसी पथक आदी उपस्थित होते.
यानंतर देगलूर पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक रवी मुंडे यांनी मानवंदना दिली. त्यानंतर पूजा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मराठवाडा गीत सादर केले.
त्यानंतर शहर व तालुक्यातील वीर सैनिकांच्या पत्नीचे व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे सन्मान करण्यात आले यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर देगलूर स्वच्छतेचा जागर ग्रुपच्या सदस्यांचे सन्मान करण्यात आले. तसेच अन्नपूर्णा अन्नछत्र यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर स्वतः अपंग असूनही आपल्या व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे चर्मकार बालाजी कांबळे हॉटेल व्यवसायिक नागनाथ यांचाही यावेळी प्रशासनाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शंकर कुदळे यांनी केले तर प्रस्ताविक शिवानंद स्वामी यांनी केले.
रक्तदान शिबिरात तीस जणांनी केले रक्तदान
शासकीय ध्वजारोहण व सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर तहसील कार्यालय येथील शंकरराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सर्वप्रथम तहसीलदार राजाभाऊ कदम, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, नायब तहसीलदार संजय नागमवाड,बालाजी सुरनर यांनी रक्तदान करून इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन केले.
यानंतर नगरपरिषद देगलूर, तहसील कार्यालय देगलूर ,पंचायत समिती कार्यालय देगलूर ,विविध शाळातील शिक्षक शहरातील नागरिक अशा एकूण 30 महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी ,नागरिकांनी रक्तदान केले .रक्तदान संकलनाचे काम डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांनी केले. यासाठी डॉ. ऋषिकेश घोडके, आरेफ पटेल, शरद अवचार, बालाप्रसाद भालेराव, परमेश्वर राठोड ,सय्यद आजम आदींनी परिश्रम केले.