दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
सार्वजनिक बांधकाम उपविभाग कंधार येथे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या रक्तदान व वृक्षारोपणाने
अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला,यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-१ सुमित पाटील यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोज शुक्रवार सकाळी ठिक ११:०० वा भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे प्रथमता पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सुमीत पाटील पुढे बोलतांना म्हणाले अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती दिन देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते.त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती करून देशाला नवे रूप दिले. देशभरात बांधलेली अनेक नदी-वरील धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठा वाटा आहे, त्यांच्यामुळेच देशातील पाण्याचा प्रश्न सुटला.
हा दिवस जगभरातील अभियंत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो,जेणेकरून ते आपल्या कौशल्याच्या जोरावर देशाला आणि जगाला प्रगतीच्या नव्या मार्गावर घेऊन जातील,सुमीत पाटील यांनी जीवन चरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले,
यावेळी जीवन आधार ब्लड सेंटर नांदेड येथील सर्व स्टाफ आपल्या तज्ञ कर्मचाऱ्यांसह उपविभाग कंधार परिसरात उपस्थित होता.
यावेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.यावेळी कार्यालयाच्या परिसरात यावेळी अभियंता भगवान शेंबाळे शाखा अभियंता,योगीराज तोटे शाखा अभियंता,राजेश जाधव कनिष्ठ अभियंता,अजय चमकुरे कनिष्ठ अभियंता व शासकीय कंत्राटदार प्रतिनिधी यांची उपस्थिती होती, यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी,कंत्राटदार प्रतिनिधी यांनी सहकार्य करून उपक्रम यशस्वीरीत्या केल्याबद्दल
सहाय्यक अभियंता श्रेणी-1 तथा कार्यालय प्रमुख अभियंता सुमित पाटील यांनी सर्वांना आभार तसेच धन्यवाद बोलताना व्यक्त केले,
अभियंता दिनी रक्तदान व वृक्षारोपण उपक्रम राबवून शासनाच्या ध्येय धोरणाचा आपल्या कार्यालया पासून आरंभ केला,त्याबद्दल सर्वत्र,कार्यालय प्रमुख, अधिकारी,कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डी.एस.मामडे,प्रमोद बास्तेवाड,संजय जोगदंड,परसराम कदम वैभव पाटील,देवानंद सोमासे, सुमनबाई कंधारे,कृष्णा परदेशी, किरण राठोड, यांनी प्रयत्न केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता राजेश जाधव यांनी केले,तर आभार अभियंता अजय चमकुरे यांनी मानले.