दै.चालु वार्ता
भोकर प्रतिनिधी विजयकुमार चिंतावार
भोकर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या उपस्थितीत भोकर येथील भाजपाचे तरुण कार्यकर्ते राजेश्वर देशमुख व त्यांच्या मित्र मंडळातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला.
भोकर येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते राजेश्वर देशमुख यांनी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस वसंत सुगावे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ सप्टेंबर रोजी गणराज रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे, उद्योग आघाडीचे जिल्हाअध्यक्ष एकनाथराव जाधव,नांदेड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक विकास कामासाठी झपाटलेले नेतृत्व असुन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो नवयुवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.त्याचीच अनुभूती आज भोकर येथे झालेल्या कार्यक्रमात आली असून या ठिकाणी राजेश्वर देशमुख व त्यांच्या मित्रमंडळातील शेकडो तरुण कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत.त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत असून आपण सर्वांनी आपल्या विभागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहावे.
आम्ही सर्वतोपरी आपणाला सहकार्य करण्यास सदैव तयार राहू असे अभिवचन दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड जिल्हा राष्ट्रवादीचे ग्रामीण अध्यक्ष इंजि. विश्वंभर पवार यांनी केले तर आभार आनंद पाटील सिंधीकर यांनी मानले.या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कांबळे यांनी केले.