दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड ( देगलूर): देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी (पु.) लगत महात्मा “बसवेश्वर नगर असून त्या वस्तीमध्ये एकूण 30 ते 32 कूटूंब राहतात. त्या वस्तीमध्ये पावसाचे पडलेले पाणी व सांडपाणी गावाबाहेर जाण्यासाठी एकच नाली असल्यामुळे पुढील वस्तीतील लोक त्या नालीवाटे पाणी जाऊन देत नाहीत अशी महात्मा बसवेश्वर नगर वस्तीतील लोकांची तक्रार असून वेळोवेळी ग्रामसेवक सरपंचाला सूचना करून पण या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिल्या नसल्याचे तेथील वस्तीतील लोकांचे म्हणणे असून काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत नाली काढली असता दोन दिवसानंतर ती नाली बुजून टाकण्यात आली आहे.
नाली बुजवलेल्या लोकांवर कोणत्या प्रकारची कारवाई ग्रामपंचायत करत नसून काही गावातील नागरिकांच्या राजकारणामुळे दोन गटात वाद वाढत असून त्या वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे याचा जबाबदार कोण? असा प्रश्न त्या वस्तीतील लोकांसमोर पडलेला आहे . नाली अडवल्यामुळे ते पाणी त्या ठिकाणी असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये साचत असून त्या साचलेल्या पाण्यामुळे मच्छर भरपूर प्रमाणात वाढले आहेत तसेच परिसरात दुर्गंधीही वाढत चालली आहे त्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, डेंगू असे विविध प्रकारचे रोगाच्या प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरी शासनाने लवकरात लवकर वस्तीतील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावे असे
सर्व नागरीकांनी विनंती केली आहे अन्यथा सामुहिक अन्न त्याग उपोषण करण्यात येईल असे निवेदन अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना शाखा देगलूर यांच्या वतीने उपजिल्हाअधिकारी तसेच बि. डि .ओ.देगलूर, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देगलूर यांना निवेदनामार्फत देण्यात आले.
त्यावेळी गावातील
हावगीराव मारोतीराव देशमुख व्यंकटराव मारुती देशमुख पांडुरंग चंद्रप्पा पाटील गजानन हनमंतराव पाटील हनमंत वीरभद्र पाटील गोविंद काशीप्पा पाटील चंद्रशेखर मारुती पाटील मनमत सुरेशराव पाटील मादाबाई हनमंतराव पाटील हनमान गणपती पाटील कपिल हवगीराव पाटील निळकंठ मुगलप्पा पाटील पार्वतबाई शंकरराव पाटील संगमेश्वर लिंगुराम पाटील दिगंबर हनमंतराव पाटील काशिनाथ चंद्रप्पा पाटील भुजंग हनमंतराव देशमुख जीवन शिवराज देशमुख सुभाष रामराव बोईनवाड माधव सटवाजी बरसमवार व्यंकट मारुती पाटील राहुल विठ्ठलराव पाटील बाळासाहेब मारुती लगडे रामचंद्र बसंतराव पाटील नरेंद्र बसवंतराव मुंडकर. अशोक गंगाराम मजगे देगलूर शिवा संघटना तालुकाध्यक्ष रुपेश दिगंबरराव पाटील भोखेसखेड शिवा संघटना शहर प्रमुख देगलूर तसेच गावातील प्रतिष्ठान नागरिक उपस्थित होते.