दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदी रवी गोळे हे विराजमान झाले असून त्यांना अंजनगाव सुर्जी तालुका क्षेत्रातील नागरिक अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.
रवी गोळे हे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथील रहिवासी आहेत.सामाजिकतेची जान ठेवत त्यांनी आतापर्यंत गावातील नागरिकांची अनेक कामे केली आणि जनतेने सुद्धा २०२२-२३ च्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये त्यांच्या पत्नी सौ.पूजा रवी गोळे यांना भरघोस मताधिक्याने जनतेतून निवडून देत त्यांना सरपंच बनविले.तर आता भारतीय जनता पक्षाने सुद्धा रवी गोळे यांच्यावर विश्वास दाखवत तालुकाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी सोपविली आहे.
तालुकाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच रवी गोळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांनी म्हटले की,पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारी ही जनसामान्यांनी मला दिलेला आशीर्वाद आहे.पक्षाशी मी एकनिष्ठ राहून गेल्या सहा वर्षांपासून भाजपा युवा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले.पक्षाने आतापर्यंत मला अनेक पदे सोपविली होती.तसेच पक्षाच्या ध्येय्य व धोरणानुसार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा मी प्रयत्न करणार आहे.तसेच पक्ष वाढीकरिता मी माझे सर्वस्व झोकून टाकणार व मला पक्षाने दिलेली जबाबदारी पार पडणार असल्याचे नवनियुक्त भाजपा तालुकाध्यक्ष अंजनगाव सुर्जी रवी गोळे यांनी म्हटले.