कोणतेच तज्ञ डॉक्टर नसतात वेळेवर हजर…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञ. दवणे जालना (मंठा)
गोरगरीबाना खाजगी रूग्णालयात उपचार घेणे हे परवडणारे नसल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या मंठा तालुक्यातील गोरगरिबांना मंठा ग्रामीण रूगणालय हे असून अडचण नसून खोळंबा झाल्याचे चित्र बनले आहे.कोणतेच तज्ञ डॉक्टर वेळेवर हजर नसल्याने रुगणांची होत आहे तारांबळ ग्रामीण रुग्णालयाची इमारत फक्त शोभेची वस्तू झाली आहे.
या ग्रामीण रुग्णालयात फक्त नावाला पदाची भरती झाली आहे मात्र त्या- त्या विभागातील डॉक्टर रुग्ण आल्यावर कधीच वेळेवर हजर नसतात. या डॉक्टर लोकांचा जास्त खाजगी रुग्णालयावर भर असतो सरकारने हे रुग्णालय गोरगरिबांना मोफत सेवा मिळावी म्हणून अस्तित्वात आणले आहे.
मात्र परिस्थिती अशी आहे की असून खोळंबा नसून बोभाटा अशी गत ग्रामीण रुग्णालयाची झाली आहे या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर कधीच टायमावर हजर नसतात त्यांच्या खाजगी रुग्णालयात माञ उपलब्ध असतात या तज्ञ डॉक्टर लोकांवर रुग्णालय अधीक्षक राजेंद्र गायके यांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे.
यामुळे गोरगरीब रुग्णाची खूप हाल होत आहेत यात वरिष्ठांनी लक्ष घालून ड्युटीच्या वेळी वेळेवर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य नागरिकातुन होत आहे.
औषधी विभागातही तज्ञ डॉक्टर लोकांनी लिहून दिलेले औषधी एक आहे एक नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे सामान्य रुग्णांना बाहेरून ह्या औषधी विकत घ्यावा लागत आहेत.याबाबत रुग्णालय अधिक्षक राजेंद्र गायके यांच्याशी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.
औषधी भंडारात रूग्णांची तारांबळ…..
डेंगू सारख्या आजाराची सात असल्याने रूग्णांची ग्रामीण रुग्णालयाकडे पळ पण ग्रामीण रुग्णालयात औषधी भंडारात नोंदणी विभाग व औषधी भंडार एकच असल्याने रूग्णांना औषधासाठी तासंन-तास रांगेत उभे राहुन सुध्दा लिहुन दिलेल्या औषधीची पुरतता होत नसल्याने रुगणांची होते तारांबळ