दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (दर्यापूर) : राज्य शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील एकूण ५११ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.त्या अनुषंगाने दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील २५०० युवक-युवतींना रोजगार प्राप्त करून देण्याचे धेय्य असून विधानसभा क्षेत्रातील युवक-युवतींना रोजगाराभिमुख मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट भाजप विधानसभा प्रमुख गोपाल चंदन यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उद्घाटन प्रसंगी बोलतांना म्हटले.
या प्रसंगी माजी आमदार रमेश बुंदीले,ऍड.कमलकांत लाडोळे,विजयराव मेंढे,नितीन पटेल,नंदु काळे,डॉ.विलास कविटकर,अड सांगोळे,मनीष मेन,रवी गोळे,गजानन लेंधे,विनोद दुर्गे,राजेंद्र रेखाते,बंडू उमक,मनोज श्रीवास्तव, प्रियंकाताई मालठाने,विद्याताई घडेकार,मायाताई लेन्धे,बोचरेताई,सगणेताई,गणेश पिंगे..