
दै चालू वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
नांदेड /नर्सी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोरे हॉस्पिटल नरसी चौक येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ठीक १०वा. फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचच्या वतीने अभिवादन सभा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम इंगोले (धन्वंतरी हॉस्पिटल देगलूर) व उद्घाटक प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे (देगलूर महाविद्यालय देगलूर) हे राहणार आहेत व प्रमुख उपस्थिती म्हणून डाॅ. मीनलताई पाटील खतगावकर (जि. प सदस्या) माणिकराव लोहगावे (जि.प सदस्य) लक्ष्मण ठक्करवाड (जि प सदस्य)श्रावण पाटील भिलवंडे (भाजपा जिल्हा सचिव) भास्कर पाटील बिलवंडे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस नायगाव) संभाजी पाटील भिलवंडे (तालुका अध्यक्ष काँग्रेस नायगाव) नरेंद्र गायकवाड (उपसभापती लोहा) डॉ शिवाजी काकडे (अंजना हॉस्पिटल नायगाव) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
तसेच या रक्तदान शिबिराचे आयोजन भास्कर भेदेकर (अध्यक्ष फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंच), सुनील कांबळे (सचिव फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंच), इंद्रजीत डुमणे (पत्रकार), संघरक्षित गायकवाड (मुखेड ता प्रतिनिधी)सय्यद आदम, नागसेन जिगळेकर,सय्यद आदम, खाजा भाई शेख, किरण इंगळे, प्रकाश हेनसांगडे, सूर्यकांत भेदे,रमेश कांबळे, धम्मदीप भद्रे, खलील शेख, संदीप सोनकांबळे यांनी केले.