गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट निर्माण केला असल्याने राज्यातील अनेक तालुक्यासह जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले आहे. तर काही तालुक्यातील व जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पदांवर नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात पक्ष बांधनीला सुरवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष माधवराव धर्माधिकारी यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ प) गट लोहा तालुकाध्यक्ष पदी छत्रपती कोंडप्पा स्वामी यांची तसेच तालुका उपाध्यक्ष पदी गजानन बापुराव पालीमकर, शहराध्यक्षपदी राम सोपानराव पवार यांची तर कार्याध्यक्षपदी विलास चुडावकर यांची निवडकरण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष माधवराव धर्माधिकारी यांच्यावतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
नियुक्तीनंतर लोहा तालुकाध्यक्ष छत्रपती कोंडप्पा स्वामी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणुन काम करताना सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. तसेच लोहा तालुक्यात निश्चितच पक्षसंघटन वाढीसाठी कटिबद्ध असून पक्षाची ध्येय – धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविणे
प्रामाणिक काम करेल असे ही म्हणाले.
लोह्यातील सर्व पदाधिकारी नियुक्तीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.