सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांना लोहा – कंधार मतदारसंघातुन शुभेच्छांचा वर्षाव
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी सेवा जनशक्ती पाॅर्टीचे पक्षप्रमुख आणि शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त शिवा संघटना तालुका शाखा लोहा यांच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिने अभिनेते तथा माजी सनदी अधिकारी अनिल मोरे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे महाराज होते तर मुख्य वक्ते म्हणून तरुणांचे आयकाॅन तथा प्रसिद्ध वक्ते प्रा विठ्ठल कागणे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास महाराज गिते, चंद्रसेन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार होते.
या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित प्रा. विठ्ठल कांगणे यांनी , पुन्हा शहिद भगतसिंग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही. आपल्या अस्तित्वाची लढाई आपल्या स्वतःलाच लढावी लागेल. प्रत्येकांने कर्तव्यासाठी आई- बापाच्या स्वप्नासाठी झगडले पाहिजे. आशा विविध मुद्द्यांवर आजच्या युवकांना मार्गदर्शन केले प्रा. प्रा.मनोहर धोंडे सरांचे कार्य चांगले आहे. येणारी विधानसभा त्यांची आहे. त्यांच्या पक्षाचे नाव सेवा जनशक्ती पक्ष आहे बाकी पक्षात सेवा नाही मेवा आहे. २०२४ ला जनतेने परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे असे प्रा. विठ्ठल कागणे म्हणाले.
सामान्य जनतेच्या हितासाठी पक्ष व निष्ठा आतापर्यंत गहाण ठेवली नाही – प्रा मनोहर धोंडे
देशामध्ये परीवर्तन घडवायचे असेल तर , प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वहायला शिकावे लागेल कारण लोहा कंधार मतदारसंघ हा गांधींच्या नोटीवर चालतो म्हणणाऱ्यांना येणाऱ्या विधानसभेत सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून औकात दाखवणार , प्रा.मनोहर धोंडे सर म्हणाले की मी नेता नाही चळवळीतला कार्यकर्ता आहे . माझा वाढदिवस मी पैसे खर्चून केला नाही तर कार्यकर्त्यांनी पैसे खर्चून केला आहे परभणी येथील सेवा जनशक्ती पाॅर्टीच्या प्रथम वर्धापन दिन व शिवा संघटनेच्या २८व्या वर्धापन दिनी मी लोहा मतदार संघातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे. उपेक्षित वर्गाला अपेक्षित ठिकाणी नेण्याचे काम सेवा जनशक्ती पाॅर्टी करणार आहे असे प्रा मनोहर धोंडे सर म्हणाले.
यावेळी प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसाला व प्रा. विठ्ठलराव कागणे यांच्या व्याख्यानमालेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. हजारो लोकांनी प्रा मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे, जिल्हा उपाध्यक्ष कालीदास मुस्तापुरे, शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, शिवा व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे, शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष साधु पाटील वडजे, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके, शिवा संघटनेचे शहराध्यक्ष सुर्यकांत आणेराव, मा .सरपंच कैलास धोंडे, सरपंच बसवेश्वर धोंडे, सोपान जाधव, अंकुश पाटील कदम, सरपंच मारोतराव सोनवळे , राजकुमार पिल्लोळे, बंडू चपटे,यांच्या सहित शिवा संघटनेच्या सर्व मावळ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन पत्रकार बापू गायखर यांनी केले.