गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : –
शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब पाटील कऱ्हाळे नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील निवडीचे पत्र शिवसेनेचे प्रदेश सचिव संजय मोरे, यांच्या हस्ते मुंबई येथे देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंदरावजी जाधव, शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख आनंदराव बोंढारे, शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, संपर्क प्रमुख सिध्देश्वर दुधवडकर, गंगाधर बडूरे, शेतकरी नेते प्रल्हादराव इंगोले, शिवाजीराव बोंढारे, अमोद साबळे, हनमंत कऱ्हाळे , बाळासाहेब कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी बाळासाहेब पाटील कऱ्हाळे यांची उपजिल्हाप्रमुख ( लोहा – कंधार ) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेना खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार युवराज वाघमारे यांनी अभिनंदन केले.