विद्यार्थ्यांनी थाटली विविध खाद्य पदार्थांची दुकाने…
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील केहाळ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत व्यावहारिक ज्ञानाची समज वाढविण्यासाठी नफा तोटा खरेदी विक्री या व्यवहारिक गणित संकल्पना रुजविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवत असते त्या अनुषंगाने मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात होता मुलांना विविध खाद्यपदार्थ समोसा, कचोरी,वडापाव,ढोकळा,गुपचूप, लाडू,बोरकूट,मटकी, तिळगुळ लाडू, गुलाब जामून, कुरमुडे,चिप्स,शेंगदाणे पट्टी,भजी, भेळ, पॉपकोन विविध फळे जसे की जांब, बोर फुले इत्यादीचे दुकाने लावून आपल्या साहित्याची विक्री केली त्यासाठी मुलांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले गावातून प्रचंड प्रतिसाद बाल आनंद मेळाव्यास
मिळाला गावकऱ्यांनी विद्यार्थ्यां जवळून भाव करून सामानाची खरेदी केली गावातील लहान मुले मुली यासह महिलांनी सुद्धा या आनंद मेळाव्यात सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांची कौतुक करण्यात आले विद्यार्थ्यांच्या स्वादिष्ट बनविलेल्या पदार्थांचा गावकऱ्यांनी मनसोक्त आनंद घेतला बाल आनंद मेळाव्यामध्ये हजारोची खरेदी करण्यात आली त्यामुळे मुलांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढविण्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यास प्रेरणा मिळाली कार्यक्रमाचे उद्घाटन गावाचे सरपंच जिल्हा परिषद शाळा समितीचे अध्यक्ष प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते झाली कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक वृंद मुख्याध्यापक यांनी केले या आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळा व कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले…