दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव नवनाथ यादव
धाराशिव/भूम:– येथील तहसील कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार सचिन खाडे यांची मुंबई कोकण विभाग येथे बदली झाल्यानंतर नूतन तहसीलदार म्हणुन जयंत पाटिल यांनी पदभार स्वीकारल्यामुळे त्यांच्याकडून भूम तालुक्यातील नागरिकांची पारदर्शक कामे व्हावी या उद्देशाने पत्रकारांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया भूम तालुक्याच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे.नवनियुक्त तहसीलदार जयंत पाटील यांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया च्या वतीने करण्यात आला असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. यावेळी नायब तहसीलदार हरिश्चंद्र पवार, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष वीर, जिल्हा कोषाध्यक्ष रवींद्र लोमटे, तालुका अध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, पत्रकार अरुण देखमुख , शंकर खामकर, सचिन बारगजे, आसिफ जमादार, आबासाहेब मस्कर, औदुंबर जाधव, तानाजी सुपेकर, नवनाथ यादव, प्रदीप साठे, रोहित चंदनशिवे, प्रल्हाद अडागळे, महावीर बनसोडे, श्याम पालके आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.