
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
नांदेड :- आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन हा दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो.सन १९९२ पासुन संयुक्त राष्ट्र संघातर्फे हा दिवस जाहिर केला गेला परंतु नांदेड जिल्ह्यात बेरोजगार दिव्यांगांसाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणामुळे गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून हि पुर्णतः न्याय न मिळाल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून राहुल साळवे यांच्या नेतृत्वात जागतिक दिव्यांग दिनी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काळे झेंडे हातात घेऊन काळा दिवस पाळत परीवहन महामंडळ कर्मचारी यांचे प्रश्न निकाली काढत दिव्यांगांसाठी एसटी प्रवास पुर्वरत करण्यात यावे यासाठी तिव्र स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सहभागी सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींना पुष्प गुच्छ देऊन एकमेकांना मिठाई वाटप करून मोठ्या उत्साहात एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर हा मोर्चा थेट जिल्हा परिषद नांदेड येथे धडकला 8 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा परिषद नांदेड येथेच पाच तास ठिय्या करावे लागल्यामुळे तसेच आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे बेरोजगार दिव्यांगांनी जिल्हा परीषदेसमोर घोषणाबाजी करत आपला मोर्चा पुढे नेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्यानंतर महानगरपालिका नांदेड समोर प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालया समोर येताच या मोर्चातील 8 ते 10 बेरोजगार दिव्यांग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर जाऊन काळे झेंडे दाखवत प्रचंड घोषणाबाजी करत शोले स्टाईल आंदोलन केले परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून इमारतीवर चढलेल्या बेरोजगार दिव्यांगांना खाली उतरविले पहिलेच जिल्हाधिकारी गैरहजर असल्यामुळे तसेच संपकरी एसटि महामंडळाच्या कर्मचाराच्या मृत्यु झाल्याची बातमी कळताच मृत्यू मुखी पडलेल्या कर्मचाराच्या परीवाराला 50 लाख रूपये आर्थिक मदतीसह परीवारातील सदस्याला शासकीय नौकरी मिळावी यासाठी आक्रोश करत मृत्यू मुखी पडलेल्या कर्मचाराला श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर संतप्त बेरोजगार दिव्यांगांनी आम्हाला आत प्रवेश द्या अन्यथा आम्ही रस्त्यावरच ठाण मांडून बसु असे म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच तीन तास रास्ता रोको करत पोलिस प्रशासनाला नाके नऊ आणुन सोडले.शेवटि पोलिस प्रशासनाकडून मोर्चे करू दिव्यांगांच्या मागणी खातर दंडाधिकारी शाखा विभागाचे श्री.दिवाकर यांना मोर्चे स्थळी आणन्यात आले परंतु कुठलाच पर्यायी मार्ग स्विकारण्यास बेरोजगार दिव्यांग सहमत नव्हते त्यामुळे दिवाकर यांनी त्यांच्या हि वरीष्ठासह बैठकिचे आयोजन करत काही मोजक्याच दिव्यांग शिष्टमंडळास आत येण्यास कळविले परंतु राहुल साळवे यांनी जी काही चर्चा होईल ती सर्वांसमोरच व्हायला हवी कारण आज आंतरराष्ट्रीय जागतिक दिव्यांगांना जर प्रवेश नसेल तर आम्ही शिष्टमंडळ तरी कशाला आत जावे अशी ठाम भूमिका घेत शेवटी सर्वांनी लंगर साहिब प्रसाद घेऊन रस्ता मोकळा करत जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा जाहीर निषेध करत 7 वाजता आंदोलन स्थगित केले आजच्या या आक्रमक मोर्चा तथा विद्रोही आंदोलनात राहुल साळवेसह,रवि कोकरे,पिंटुदादा बद्देवाड,कार्तिक भरतीपुरम,सुनिल जाधव.शेख आतीक,आनंदा माने,शिवाजी सुर्यवंशी,संतोष गज्जलवाड,कमलाकर टाकळिकर,राजु ईराबतीन,भोजराज शिंदे,गजानन इंगोले,प्रकाश नागोरे,नागोराव साळोंखे,नागनाथ कामजळगे,व्यंकट कदम,शेख उमर,किरणकुमार न्यालापली,शेषेराव वाघमारे,विष्णु जायभाये,प्रदिप हणवते,सय्यद आरीफ,शेख आलीम,नागनाथ गोंदले,शेख गौस,राजेश सावरगावकर,मसुद मुलाजी,संदिप घुगे,रमेश लंकाढाई,भाऊसाहेब टोकलवाड,नागेश निरडी,नागोराव कदम,दिलीप कांबळे,संजय बोईनवाड,गोविंद बोड्डेवार,संभाजी सोनाळे,मुंजाजी कावळे,राजेश फरकंडे,व्यंकटि सोनटक्के,प्रशांत हणमंते,सिद्धोधन गजभारे,राजुमार देवकर,अजय गोरे,मंगेश जाधव,सुनिल सोनुले,नागोराव शिंदे,गणेश वर्षेवार,परमेश्वर शेटवाड,लक्ष्मण गोरालाड,सय्यद पिरसहाब,शंकर पांचाळ,अंबादास धोत्रे,पांडु तांदळवाड,निल्लावार सावकार,पांचाळ,कमलबाई आकाडे,कल्पणा सप्ते,सविता गावते,मनिषा पारधे,सुमित्रा शिरूळे,रेणुका फसकुलवाड,ऊषा थोरात,लक्ष्मी वर्षेवार,रेणुका आकाडे,परशुराम गायकवाड, विश्वांभर दळवे,हरीकृष्ण भुसेवार, दिनेश डूमने,आर्यन श्रीमंगले यासह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते तर जाहिर पाठिंब्यास्तव सहभागी भाजपा दिव्यांग आघाडी मुखेड.लुईस ब्रेल दि ब्लाइंड मेन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.मुकबधीर – कर्णबधिर दिव्यांग संघटणा नांदेड.दिव्यांग संघर्ष समीती अर्धापुर.मुदखेड.लोहा.हदगाव.उमरी.यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.