
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे : लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक झाली, तरीही ते व्यासपीठावर उपस्थित राहिले.यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही ना काही कारणाने गाजले.
या साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला.यावेळी काही ठराव घेण्यात आले.
समारोप समारंभाला खासदार शरद पवार, न्या. नरेंद्र चपळगावकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, नाशिकचे निमंत्रक जयप्रकाश जतेगावकर उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा, राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.
नैसर्गिक आपत्तीमुळे गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी. साहित्यिकही सर्वतोपरी मदत करणार.
मराठी भाषिक शाळा बंद पडताय, राज्य सरकारनं उदासीनता झटकून सकारात्मक प्रतिसाद करून शाळा सुरू व्हाव्या.
प्रकाश निर्मळ यांचं अभिनंदन ठराव.
भाषाविषयक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा ही मागणी
कर्नाटक सरकार मराठीची गळचेपी करतंय, त्यांच्या धोरणाचा हे सम्मेलन निषेध करीत आहे.
राज्यात 60 बोली भाषा,या भाषांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकारने कृती कार्यक्रम आखावा
राज्यात सरकारने स्थापन केलेली परिचय केंद्र नामशेष झाली आहे,गोवा आणी राज्यात मराठी मानसंवही नेमणूक करावी
ळ या वर्णाला न्याय द्यावा
ग्रंथालय कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला मिळावा. सर्वच वाचनालयानी दर्जा राखावा.
बागुल, वामनदादा कर्डक यांचं उचित स्मारक व्हावे.