
जागतिक मृदा दिन साजरा
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
लोहा प्रतिनिधी राम कराळे नांदेड.
शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा कार्यक्षम वापर करावा. मृदा चाचणीतून शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी नांदेड यांच्यावतीने आत्मा कार्यालय नांदेड येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड पंचायत समिती सभापतीचे प्रतिनिधी बबनराव वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील शास्त्रज्ञ राजीव इंगोले यांची उपस्थिती होती.
मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करून सर्वांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खताच्या मात्रा द्याव्यात, असे श्री. चलवदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शेतीतील मृदा नमुना कसा घ्यावा