
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
रावेर :- बिहार राज्यातील पटना येथिल मानसिक स्थिती ठिक नसलेल्या महीलेस रावेर पोलीस ठाण्याचे पो.काॅ.निलेश लोहार यांनी त्यांच्या कुटुंबाचा शोध घेऊन तिच्या वडीलांच्या ताब्यात दिले.यावरुन वर्दीतील पोलीसाच्या माणुसकिचे दर्शन घडते. फूलवरी पटना (बिहार) येथील निभाकुमारी वय-३८ ही महीला बरेली- वाराणसी ट्रेनमधुन २२ रोजी रात्री प्रवास करीत होती.या महीलेचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने निभाकुमारी स्टेशनवर उतरली रात्रीला काही सहारा नसल्याने ती रावेर स्टेशनवर थंडीत कुडकुडत झोपुन गेली.तिच्यासोबत कोणीही नव्हते सकाळी स्टेशनवर येथील चेतन रेतवानी व राजेश जैस्वाल हे कामानिमित्त गेले होते त्यांनी ही महीला थंडीत कुडकुडत असल्याचे दिसले त्यांनी या ठिकाणी असलेले पोलीस जमील शेख यांना याची माहिती दिली.या महिलेजवळ जाऊन शेख यांनी विचारपुस केली.
रेतवानी, जैस्वाल,शेख यांनी तात्काळ पोलीस निलेश लोहार यांच्याशी संपर्क केला.या महीलेला रावेर पोलीस स्टेशनला आणण्यात आले.निलेश लोहार यांनी याबाबत ची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना दिली.पोलीस निलेश लोहार यांनी निभाकुमारीला विचारुन त्यांचे वडील जय प्रकाश सिंग रा.पटणा (बिहार) यांचा मोबाईल नंबर घेऊन लोहार यांनी त्यांच्याशी संपर्क केला.निभाकुमारी रावेर येथे पोलीसांच्या ताब्यात आहे असे सांगितले.मानसीक स्थिती ठिक नसलेली मुलगी त्यांनी त्यावेळी समाधान व्यक्त केले.मुलीला तुमच्या ताब्यात ठेवा ,मी तिला घेण्यासाठी येतो असे तिच्या वडिलांनी सांगितले.पटना येथून तिचे वडील जयप्रकाश सिंग हे सुमारे १४०० किलोमीटरवरुन रावेर येथे आले.मुलीला सूखरूप पहाताच त्यांच्या डोळ्यात आनंदअश्रू तरळले.
यांनी केले सहकार्य- निभाकुमारीची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तिचे वडील येईपर्यंत सांभाळणे खूप जिकिरीचे काम होते.मात्र तिची काळजी महीला पोलीस रईसा तडवी,माधवी मोरे, मनीषा जाधव,अमृता मिशीतकर यांनी घेतली.त्यांना पोलीस निलेश लोहार,सपोनि शितलकुमार नाईक, फौजदार मनोहर जाधव, फौजदार विशाल सोनवणे, फौजदार सचिन नवले,स.फौ.इस्माईल शेख,पोहेकाॅ.विजू जावरे,श्रीराम वानखेडे,विष्णू भिल,पो.काॅ.विकार शेख,विशाल पाटील,प्रमोद पाटील, गुलाब सैदाणे,श्रावण भिल यांनी निभाकुमारी या महीलेचा सांभाळ करण्यास सहकार्य केले.
वडीलांनी मानले पोलीसांचे आभार- निभाकुमारीला दोन मुले आहेत.निभाकुमारी ही चार वर्षांपूर्वी खूप उंच जागेवरून जमिनीवर पडल्याने तिच्यावर औषधोपचार सुरू होते.तेव्हापासुन तिचे मानसिक संतुलन ठिक राहत नाही.असे तिचे वडील जयप्रकाश सिंग यांनी पोलीसांना सांगितले.पोलीसांनी दाखवलेल्या माणुसकी आणि कर्तृत्वतत्परमुळे त्यांची मुलगी मिळाल्याने त्यांनी पोलीसांचे आभार मानले.