दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
जयपूर / राजस्थान : मुख्यमंत्री अशोक गेहलोत जनपथवर पोहोचले आहेत. इथं ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. केसी वेणुगोपालही 10 जनपथवर पोहोचले आहेत. अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलटही (Sachin Pilot) आज सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं कळतंय. गेहलोत सरकारमधील मंत्री परसादी लाल मीणा यांनी पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्यावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले, जो व्यक्ती भाजपच्या कार्यालयात जावून बसतो, त्या व्यक्तीला आम्ही मुख्यमंत्री म्हणून स्वीकारु शकत नाही. जनता आम्हाला सोडणार नाही आणि आम्ही पुढची निवडणूक जिंकू शकणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.