दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
वॉशिंग्टन:अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्यांच्या दरम्यान जोरदार संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघारही घेतली.
या संघर्षानंतर अमेरिकेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संघर्षानंतर भारत आणि चीनच्या सैन्यांनी तात्काळ माघार घेतली. याबद्दल बायडेन प्रशासनाने आनंद व्यक्त केल्याचं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव काराइन जीन पियरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे